या निषेधाचा निषेध ......!!
१३ जुलै २०११ , मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. एकामागून एक ३ स्फोट दादर, ओपेरा हौस आणि झवेरी बझार. २१ निरपराध लोक मृत्युमुखी पडली तर १०० हून अधिक जखमी .
सगळीकडून या स्फोटाचा निषेध व्यक्त करण्यात आला,मग यात social networking sites तरी कशा मागे राहतील.याच वेळी मी होतो facebook वर, सगळे जन status update टाकून आपले दुख व्यक्त करत होते.सहानुभूतीच्या status updatecha जणू पूरच आला होता facebook वर. काळे DP लावून निषेध केला जात होता.२-३ दिवस निषेध अगदी जोरावर आणि मग आठवडाभरात ते काळे DP गायब.
७ सप्टेबर २०११, पुन्हा तीच घटना, जागा मात्र वेगळी. यावेळी निशाण्यावर होती दिल्ली. पुन्हा बरेच निरपराध लोक यात बळी पडली.याच संध्याकाळी मी पुन्हा facebookvar. पण विशेष म्हणजे यावेळी एक status update नाही निषेधाची :-( . कोणी आपले DP काळे केले नाहीत.
हे निषेध करणारे गेले तरी कुठे आता.....?
आणि माझ्या मनात बरेच प्रश्न येवू लागले, असे का ? कारण काय यामागचे ?
लोकांना माहीतच न्हवते कि बॉम्बस्फोट झाले?
कि माहित असून निषेध करायचे विसरले ?
कि आपल्याला याची आता सवय झाली, म्हणून निषेध केला नाही ?
कि असा निषेध करून काही होत नाही याची जाणीव झाली ?
कि मुंबईत झालेले स्फोट आपल्या घराच्या जवळ पास झाले होते,म्हणून त्याच्या वेदना आपल्याला पोहचल्या आणि दिल्ली आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब, म्हणून आपल्याला त्याचे गांभीर्य जाणवले नाही ?
नक्की काय बर कारण असावे .....?
मी इथे कोणालाही जबरदस्ती करत नाही आहे कि तुम्ही निषेध करा म्हणून किंवा जेव्हा कधी स्फोट होईल तुम्ही केलाच पाहिजे निषेध , पण जरा विचार करून पहा हा असला कसला हो निषेध ? मी समजू शकतो तुमच्या निशेधामागच्या भावना. पण हे असे कसे कि घराजवळ झाला कि मग संताप व्यक्त करायचा आणि लांब कुठे झाला कि काही घेणेदेणे नसल्यासारखे ....?
हा निषेध पटतोय का तुम्हाला ?
मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर मी आपला आभारी असेन .. शेवटी मला पण समझू द्या कि हे असे का ...?
आणि शेवटी एकच गोष्ट मित्रानो हाच बॉम्बस्फोट जेव्हा आपल्या घरत होईल ना तेव्हा आपण त्याचा निषेध करायला पण नसू ............!
(P.S.: हा blog मराठीत खास माझा मित्र केदार खामकर आणि सिद्धेश वैरागी च्या आग्रहाखातर .... ;-) .. )
dhanyawad !!!marathi sathi...maze mat vicharshil tar media var delhi bomb blast peksha lalbag la gelele celebrity zalaktayt..ganpatila milale gold n paise mojanyat media vyastha aahe .tyamule ardhyahun jasta lokana bomb blast zalela suddha mahiti nahi aani nishedh karun kahich sadhya hot nahi hey pan lokana samjun chukaley...tuza nishedh yogya aahe...
ReplyDelete